गुप्तहेर, सुरक्षा संस्थांचा गाफिलपणा नडला   

नवी दिल्ली : व्याप्त काश्मीरमध्ये हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले. सुरक्षा नसलेल्या पर्यटनस्थळांची माहिती पुरवली गेली होती. दहशतवादी म्होरक्यांनी हल्ले करण्याचे इशारे दिले होते. एकंदरीत व्याप्त काश्मीरमध्ये हल्ल्याचे कारस्थान रचले होते. त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. पर्यायाने गुप्तहेर संस्था आणि सुरक्षा यंत्रणांचा गाफिलपणा नडल्याचे उघड होत आहे.
 
व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी गटांनी हल्ला करण्यात येईल, असा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. पण, गुप्तहेर संस्था आणि सुरक्षा यंत्रणांनी इशारे गांभीर्याने घेतले नाहीत. तसेच हल्ला टाळण्यासाठी तत्परतेने पावले उचलली नाहीत. त्याचे दुष्परिणाम पर्यटकांना भोगावे लागले आहेत. व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या म्होरक्यांनी नियोजनपूर्वक हल्ल्याचे नियोजन केले होते. दहशतवाद्यांना त्यासाठी मार्गदर्शन केले गेले होते. त्यांन शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. तसेच जेथे प्रशिक्षण दिले जात आहे त्याबाबतचा ढोबळ अहवाल दिला होता, काही पर्यटनस्थळी पर्याप्त सुरक्षा नाही, असेही गुप्तचर सूत्रांनी सांगितले होते. सूत्रांनी सांगितले की, हल्लेखोरांकडे हेल्मेटवर बसवता येणारे कॅमेरे होते. त्या माध्यमातून त्यांनी परिसराची पाहणी देखील केली होती. त्याच्या चित्रफिती हल्लेखोर  दहशतवाद्यांपर्यंत पुरवल्या गेल्या होत्या.
 

Related Articles